महागाव नगर पंचायतच्या ब्रँड अँबेसिडर पदी साईनाथ महाराज यांची निवड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- महागाव नगर पंचायतच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अँबेसिडरपदी स्वछतेसाठी जनजागृती करणारे गुरुवर्य साईनाथ महाराज यांची निवड करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ साठी महागाव चे सामाजिक कार्यकर्ते,स्वतः झाडू घेऊन गाव स्वच्छ करून जनतेमध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृती करणारे ,स्वच्छता प्रेमी, गुरुवर्य श्री.साईनाथ महाराज ह्यांची २६ जानेवारी २०२३ रोजी स्वच्छता विभागाच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी त्यांना नगराध्यक्ष सौ. करूणा ना. शिरबिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आले
यावेळी गटनेते नगरसेवक रामराव पाटील नरवाडे , आरोग्य सभापती प्रमोद भरवाडे, उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे , बांधकाम सभापती गजानन साबळे ,नगरसेवक विशाल पांडे , नगरसेवक सुजितसिंह ठाकूर, नगरसेविका सौ. रंजना आडे,सौ.आशा बावणे ,शहर समन्वयक पल्लवी रत्ने व नगर पंचायत महागाव चे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते