औषधी विक्रेता संघाकडून शीत शवपेटीचे लोकार्पण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- महागाव तालुका औषधी विक्रेता संघाकडून शीत शेवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. विकास मंच बहुउद्देशीय समिती कडून मोक्षधाम विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून शीत शवपेटी विकास मंच समितीकडे हस्तांतरीत करण्यात आली. शीत शेवपेटीचा लोकार्पण सोहळा येथील मोक्षधामात पार पडला.यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता संघाचे संघटन सचिव सुरज डुबेवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.पुसद तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष रवी पदमवार,क्रेडिट को.ऑप. सोसायटीचे संचालक रणवीर पाटील,माजी जिल्हा उपाध्यक्ष विनायक डुबेवार,आर्य वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ.संतोष मोटारवार,अनुप उत्तरवार, महागाव तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष श्रीरंग चिद्दरवार यांची मंचावर उपस्थिती होती.औषधी विक्रेता संघाकडून यापूर्वी महागाव मोक्षधाम समितीस स्वर्गरथ विनामूल्य भेट देण्यात आला. त्या पाठोपाठ आज शीत शवपेटी देऊन संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. महागावात लवकरच सर्जिकल बँक सुरू करून गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात दिला जाईल अशी हमी सुरज डुबेवार यांनी दिली.पत्रकार गजानन वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विकास मंच बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष उदय नरवाडे, उपाध्यक्ष नारायण शिरबिरे, सचिव विठ्ठल वाघमारे, मनोज भरवाडे, बाळूभाऊ वाकोडे, नंदकुमार कावळे, विनोद पावडे,सोहम मोहटे, कार्तिक बावणे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.