राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त ; मोदींना दिलेल्या पत्रात ‘हे’ सांगितलं कारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.
महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती.
अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे. परवा पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी मोदींकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश निर्माण झाला होता. त्यांनी उचलबांगडी करावी, अशी मागणी अनेकांनी केली. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.
आता अखेर खुद्द कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते पायउतार होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यांनी राजीनामा पत्र पंतप्रधानांकडे दिल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….