‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी ; हिंदू महासंघाचा विरोध..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या शहराचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. तर या नावास हिंदू महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी यांनी काय मागणी केली?
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

हिंदू महासंघाचा नामांतरास विरोध
तर पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्यास हिंदू महासंघाने विरोध केले आहे. “जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदणीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे,” अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….