”भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही”; नाना पटोले यांची टीका, म्हणाले “ते सत्तेत फक्त..”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला. आता नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेला जागा सोडली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
आमचा प्रयत्न आहे की सेनेचे उमेदवार, डायगव्हाणे आणि कपील पाटील यांचा उमेदवार, यांच्यात बैठक घेऊन हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारासोबत राहू. कॉंग्रेसमध्ये कुणाचीही आणि कशाचीही नाराजी नाही. कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, तो कुठे आहे दाखवा, असे आव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ‘ते’ सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय, असे नाना पटोले म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….