उद्घाटनापूर्वीच ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर पुन्हा दगडफेक ; नव्या ट्रेनला मोदी दाखवणार होते हिरवा झेंडा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- लकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
‘वंदे भारत एक्सप्रेस’ वर दगडफेकीची ही पहिलीच घटना नाहीये.
यापूर्वी कोलकात्यात (Kolkata) या ट्रेनवर दगडफेक झालीये. हावडा-जलपाईगुडी वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांनी मालदा इथं ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.
मालदा शहरापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
विशेष म्हणजे, रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आलीये. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेनं आतापर्यंत देशात सुमारे 7 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. या वर्षी म्हणजेच, 2023 मध्ये सरकार देशात एकूण 75 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करणार आहे.
भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांना अधिक सोयी आणि सुविधा देण्यासाठी ‘वंदे भारत’च्या तिसऱ्या आवृत्तीच्या डिझाइनवर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर क्लास जोडण्याची तयारी करत आहे, त्यामुळं प्रवाशांचा लांबचा प्रवास सुकर होणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….