उत्तर प्रदेश ; भाजपचे ज्येष्ठ नेते केशरीनाथ त्रिपाठींचं निधन ; 3 वेळा भूषवलं होतं विधानसभेचं अध्यक्षपद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रयागराज (उत्तर प्रदेश) :- केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी 8 डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळं त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हापासून त्यांनी खाणंपिणं बंद केलं होतं.
उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचं निधन झालं. ते बरेच दिवस आजारी होते.
प्रयागराज येथील राहत्या घरी आज पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशरीनाथ त्रिपाठी हे भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते होते. यूपीच्या राजकारणात त्यांची वेगळी ओळख होती. मुलगा नीरज त्रिपाठी यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिलाय. नीरज त्रिपाठी यांनी सांगितलं की, ‘वडिलांवर घरी उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’
केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी 8 डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळं त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हापासून त्यांनी खाणंपिणं बंद केलं होतं. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. 30 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना प्रयागराज शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणलं. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्रिपाठींनी 3 वेळा भूषवलं यूपी विधानसभेचं अध्यक्षपद
केशरीनाथ त्रिपाठी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. व्यवसायानं वकील असलेल्या केशरीनाथ त्रिपाठी यांची गणना भाजपच्या बलाढ्य नेत्यांमध्ये होते. ते तीन वेळा यूपी विधानसभेचे अध्यक्ष होते. यासोबतच यूपी भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षाला पुढं नेण्याचं काम केलं. या शिवाय, त्रिपाठी यांनी जुलै 2014 ते जुलै 2019 या कालावधीत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलंय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….