बच्चू कडू यांनी सरकारविरोधात दंड थोपटले…! विधान परिषदेच्या पाचही जागांवर दिले उमेदवार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गटाची साथ देणाऱयांमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधान परिषदेच्या पाचही जागांवर आपले उमेदवार उभे करत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने हे पाऊल आपण उचलले असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतची सगळी कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. या निवडणुकांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मेहनत करतोय. त्यासाठी आम्ही प्रचंड मतदार नोंदणी केली आहे. या निवडणुकीत शिंदे गट, प्रहार आणि भाजपा अशी युती करून उमेदवार द्यावेत, अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे पाचही मतदारसंघात उमेदार उभे करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाने घेतला असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….