शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज :- संजय राऊत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे गटात अजून काही गट निर्माण झाले आहेत आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे. मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या गटाचे वैफल्य आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
या वेळी राऊत म्हणाले की, ”शिंदे गटाचे अजून काही गट निर्माण झाले आहेत आणि तेथे टोळी युद्ध सुरू आहे, अशी माहिती आहे. रविवारीच ( दि. १ ) अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की, माझ्या गटातील लोकचं ‘माझा करेक्ट कार्यक्रम करतायत’. यावरून काय सुरू आहे, हे तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या. त्यांच्या गटामध्ये काय घालमेल सुरू आहे, काय हालचाली सुरू आहेत, कसे वाद सुरू आहेत हे समजून घ्या.”
निम्म्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पक्षात जातील
मी वारंवार सांगत आहे, हे सरकार टिकणार नाही आणि हा गटही टिकणार नाहीत. यातील निम्म्यापेक्षा जास्त लोक भाजप स्वतःला विलिन करून घेतील. तेच त्यांच अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना शिवसेना परत स्वीकारणार नाही. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा हे त्यांच्या गटाचं वैफल्य आहे. त्यामुळेच केसरकर म्हणतात की, एकत्र येऊया, असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार अपात्र ठरतील. कायदेशीर दृष्टीनं आमची बाजू भक्कम आहे, असा विश्वासही राऊत यांनी या वेळी व्यक्त केला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…