मोठी बातमी…! नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनीला भीषण आग…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भडकलेली आग तसेच दाखल झालेल्या रुग्णवाहिका लक्षात घेता या घटनेत अनेकजण जमखी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मुंडे गाव या भागात जिंदाल कंपनी आहे. याच कंपनीला आज अचानकपणे आग लागली आहे. या आगीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे अनेक रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या आहेत. याच कारणामुळे आगीमुळे अनेक कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
धुराचे लोट आणि आगीचा भडका
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली आहे. आगीचे स्वरुप भीषण असून धूर आणि आगीचे लोट दूरपर्यंत पसरले आहेत. कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…