आजचा दिवस राजकीय बोलण्याचा नाही, प्रकाश आंबेडकर यांची टिप्पणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- सामाजिक उन्नयन आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा हा दिवस आहे. देशात हजारो वर्षे सामाजिक आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईत संपल्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाला या लढाईपासून सुरुवात झाली. त्यामुळे आज राजकीय काहीही बोलणार नाही, अशी टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली.
कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभाला आंबेडकर यांनी सपत्नीक अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की सामाजिक उन्नयन आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा हा दिवस आहे. देशात हजारो वर्षे सामाजिक आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईत संपल्या. त्याचे प्रतिक असलेल्या या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक येतात.
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या अभिवादन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, की अभिवादन करण्यासाठी कोणी यायचे, कोणी यायचे नाही, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर भाष्य करणार नाही. आज कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…