नागपुरात आज बरेच बॉम्ब फोडणार आहोत ; शिवसेना नेते संजय राऊत यांचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खासदार संजय राऊत आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत शिवसेना शाखांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला. ‘नागपूर येथे सोमवारी आम्ही बरेच बाॅम्ब फोडणार आहोत’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्या ठिकाणी मोठ-मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. यातच संजय राऊत यांनीही सरकारला इशारा दिला आहे.
‘अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार, तुमचे शंभर पापे भरली आहेत. तुम्हाला सोडणार नाही’, असेही राऊत म्हणाले. मी ज्या कोठडीत होतो, आता त्यात तुम्हाला टाकणार, तुमच्या सर्व फायली तयार आहेत, असा इशाराही राऊत यांनी दिला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…