फुलसावंगीत मटका तर हिवऱ्याचा सलीम गुटखा तस्करीत अव्वल ; प्रभारी ठाणेदाराच्या कार्यकाळात अवैध धंद्याचा आलेख वाढला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
महागाव :
महागाव तालुक्यातील अवैध धंदे थांबता थांबेना. प्रभारी ठाणेदाराच्या कार्यकाळात अवैध धंद्याचा आलेख वाढतच चालला आहे.यावर लगाम लावण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.जिल्ह्याची धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याकडे लक्ष देवून महागाव पोलीस स्टेशन ला कायमस्वरूपी ठाणेदार देण्याच्या मागणीला जोर आला आहे.पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासन हप्तेवारीत मशगुल असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महागाव तालुक्यातील सर्वाधिक अवैध व्यवसाय फुलसावंगीत सुरू आहेत.तर गुटखा तस्करीत हिवऱ्याचा सलीम तालुक्याला गुटख्याची होलसेल विक्री करत आहेत.त्यामध्ये हे महाशय अव्वल क्रमांकावर आला आहे.मोठ्या प्रमाणात शरीराला अपायकारक असणाऱ्या गुटख्याची विक्री बंदीचा या सलिम्याने फज्जा उडवला आहे.पोलीस दलाला या तस्कराची संपूर्ण माहिती असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणेला अद्यापही मुहूर्त सापडला नाही.परिणामी त्याने आता तालुक्याबाहेरही आपले तस्करीचे रॅकेट सुरू केले आहे.
महिन्याभरात ५० लाखांची उलाढाल या अवैध गुटखा तस्करीत सुरू आहे.ही माहिती सर्वश्रुत असताना महागाव पोलीस यंत्रणा मात्र अर्थकारणाने चिडीचूप बसल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. या गुटखा तस्करांने तालुक्याचा “हब”च हिवरा गावाला केल्याने अवैध मार्गाने कमावणाऱ्या सलिम्याने आतंक माजवला आहे.घरात दडवून ठेवलेल्या लाखोंच्या गुटख्यावर कार्यवाहीचा मुहूर्त पोलीस प्रशासनासह अन्न व औषधी प्रशासनाला कधी गवसणार असा सवाल आता समोर येवू लागला आहे.फुलसावंगी मध्ये महिन्याकाठी मटक्यात करोडोची उलाढाल करण्यात येते. मटक्याच्या नादात अनेकांचे कुटुंबही उध्वस्त झाले आहेत. मटका लावण्यासाठी तरुणांची संख्या जास्त वाढली आहे.मटक्याचे खावाल गावातील चार व्यक्ती चालवतात याची पूर्व कल्पना बीट जमादार सह प्रभारी ठाणेदाराला आहे.मात्र महिन्याकाठी मिळणारा बाजरा चोखण्यासाठी ही यंत्रणा मटका खावालांच्या ताटाखालचे मांजर बनले आहे. तत्कालीन बीट जमादाराच्या कार्यकाळात बंद असलेले अवैध धंदे विद्यमान जमांदाराच्या काळात तिपटीने वाढले आहे.
या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस यंत्रणा हप्ते मोबदल्यात कार्यवाहीसाठी पाठ फिरवल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी प्रभारी ठाणेदार पायउतार करावे आणि स्वतंत्र कार्यवाही साठी पथक नेमावे अशी जनभावना नागरिकांची आहे.