आज पुसद येथे भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन ; विदर्भातील टॉप टेन सौष्ठवाची होणार निवड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अत्याधुनिक व डिजिटल कार्य प्रणालीमुळे देशातील तरुणाई शरीर सौष्ठवावर कमालीचे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. सामाजिक उपक्रमात अग्रणी असलेले पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे संकल्पनेतून सुदृढ व बलशाली तरुणाईच्या जडणघडणीसाठी स्थानिक भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत व टायगर ग्रुप, पुसद यांचे संयुक्त विद्यमाने भव्य विदर्भ स्तरीय टॉप टेन शरीर सौष्ठव स्पर्धा – 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.24 डिसेंबर रोजी स्थानिक पुसद अर्बन को-ऑप बँक लि. मुख्य शाखा, तलाव लेआऊट, पुसद येथे सायंकाळी 5:30 वाजता आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये विदर्भातील शेकडो नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.
आ.ऍड इंद्रनील नाईक यांचे अध्यक्षतेत स्पर्धेचे उदघाटक टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ पै.तानाजी जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ऍड.निलय नाईक हे राहणार आहेत.

विदर्भ बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन तथा यवतमाळ बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त सदर स्पर्धेतील सहभागी मल्लातून दहा शरीर सौष्ठवांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेतील दहा सर्वोत्कृष्ट शरीर सौष्ठवास अनुक्रमे प्रथम पारितोषिक 31हजार रुपये पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे तर्फे, द्वितीय बक्षीस 25 हजार रुपये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुकूल चव्हाण यांचे तर्फे, तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांचे तर्फे, चतुर्थ पारितोषिक पंधरा हजार रुपये माजी नगरसेवक निखिल चिद्दरवार यांचे तर्फे, पाचवे पारितोषिक तेरा हजार रुपये माजी आरोग्य सभापती ऍड.भारत जाधव यांचे तर्फे, सहावे पारितोषिक अकरा हजार रुपये माजी नगरसेवक अभिजित चिद्दरवार यांचे तर्फे, सातवे पारितोषिक नऊ हजार रुपये सामाजिक कार्येकर्ते समीर गवळी यांचे तर्फे, आठवे पारितोषिक सात हजार रुपये माजी नगरसेवक उत्तम चापके यांचे तर्फे, नवंवे पारितोषिक पाच हजार रुपये भाजयुमो चे शहराध्यक्ष सौरव जयस्वाल यांचे तर्फे, दहावे पारितोषिक तीन हजार रुपये हनुमान आखाड्याचे वस्ताद केशव गुरू यांचे स्मृती प्रित्यर्थ पै.अभिमन्यू शिंदे व पै.शुभम जाधव यांचे तर्फे जाहीर करण्यात आले आहे.
विदर्भातील टॉप टेन सौष्ठवाची होणार निवड….
नामवंत पहेलवान टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव यांचे उपस्थितीत विदर्भातील दहा शरीर सौष्ठवांची निवड होणार असल्याने विदर्भातील पहेलवान नोंदणी करिता पुसदकडे धाव घेत आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….