भाजपा नेते मोहित कंबोज यांना दोन प्रकरणांत क्लीनचिट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.
या गुन्ह्यामध्ये मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. तसंच, आर्म्स अॅक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांतही त्यांना क्लीनचिट मिळाली आहे.
राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापले आहे. अशातच भाजपा नेत्याला क्लीनचिट मिळाले आहे. याचे पडसाद आता विधिमंडळातही उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, क्लीनचिट मिळाल्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्वीट करत मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुफ मोड चुका हू! असं ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
नेमके प्रकरण काय?
2011 ते 2015 या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून (Indian Overseas Bank) 52 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. पण कंबोज यांनी कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा वापर न करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंबोज यांनी हे 52 कोटींचे कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप ठेवण्यात आला.
बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल
“मला कळाले मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असे करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसे होणार नाही. हे नवाब मलिकांचे काम असेल किंवा संजय राऊतांचे काम असेल तर मी याच्याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही”, असे कंबोज यांनी म्हटले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….