पुसद आदिवासी प्रकल्प कार्यालय बांधकामासाठी ८ कोटी ६९ लक्ष निधी मंजुर ; आदिवासी बांधवांनी आमदार इंद्रनील नाईक यांचे मानले आभार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथील कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी मागील अनेक वर्षापासुन आदिवासी बाधवांची मागणी होती. यासाठी विविध आदिवासी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे पुसद शहरामध्ये जागा मिळावी अशी मागणी केली होती. तेव्हा जिल्हाधिकारी, up विभागीय अधिकारी , प्रकल्प अधिकारी , पुसद मुख्याधिकारी, महसूल अधिकारी , तहसीलदार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची वारंवार बैठका लावुन जागेचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर बांधकामासाठी निधी अपेक्षित होता तेव्हा तात्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार , तात्कालीन आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यासह आताचे आदिवासी विकास मंत्री विजय गावीत यांच्याकडे सातत्याने इंद्रनील नाईक यांनी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणुन पुसदच्या प्रकल्प कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी आठ कोटी एकोणसत्तर लाख एवढा निधी मंजुर झाला त्याबद्दल आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अध्यक्ष ऍड सुनिल ढाले , सुरेश धनवे , राजेश ढगे, ऍड रामदास भडंगे , पांडुरंग व्यवहारे , गजानन उघडे, रामकृष्ण चौधरी आदींनी आमदार इंद्रनील नाईक याचे आभार मानले .

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…