आज समोर आला धक्कादायक प्रकार…. ; सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन स्टिकफास्टने केले बंद ; मतदान रोखण्याचा अजब फंडा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.
याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आले. यामुळे मतदान तब्बल दीड तास बंद झाले होते. तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीनमध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.
गावात गोंधळ
सदर प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता. मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती. सदरील प्रकार कोणी केला? याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…