मोठी बातमी : शिवसेनेचे नगराध्यक्ष अन ७ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश ; सामंतांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची संधी साधली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रत्नागिरी :- लांजा तालुका शिवसेनेत भूकंप झाला असून लांजा नगरपंचायतीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्ष मनोहर बाईत आणि सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे.
यामुळे नगरपंचायतीवरील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लांजा शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात होती. लांजा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे काही नगरसेवक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
नगरपंचायतीमधील उपनगराध्यक्ष तथा गटनेत्या पूर्वा मुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी ठाम असल्याचे जाहीर केले होते. या गोष्टीला १५ दिवसांचा कालावधी उलटतो ना तोच पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला आहे.
रत्नागिरीत शुक्रवारी (ता. १६ डिसेंबर) झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेविका दुर्वा भाईशेटे, वंदना काडगाळकर, समृद्धी गुरव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले, मधुरा बापेरकर, सोनाली गुरव या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुनील ऊर्फ राजू कुरूप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा झाला. नगरसेविका सोनाली गुरव या पक्षप्रवेशावेळी उपस्थित नव्हत्या. मात्र, पक्षप्रवेशाच्या यादीत आणि स्वतंत्र गटाच्या अर्जावर त्यांनी सही केली आहे.
लांजा नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी विकासाचा ध्यास घेऊन पक्षप्रवेश केला आहे. शहरातील प्रलंबित कामे आता जोमाने सुरू होतील, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत सहकार्य करणार आहेत, असे सामंत समर्थक राजू कुरूप यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….