वाद पेटणार…! चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाईफेकीची धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लेले यांच्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. विकास लोले यांच्याविरोधात पिंपरीच्या सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार अशा आशयाची पोस्ट विकास लोले यांच्याकडून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यावरून राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर तापलं होतं. आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार?* मु.पो.सांगवी , पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या अशा आशयाची पोस्ट लिहण्यात आली आहे. चंपाच तोंड काळे करा रे, असा धमकीछा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे.
याबाबत भाजपाचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 153 अंतर्गत द्वेष भावना पसरविणे आणि कलम 505 नुसार धमकी देने या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले आणि दशरथ बाबुराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून व्हाट्सऍप स्टेट्स ठेवून समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगवी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पवनाथडी जत्रेला जाणार आहेत.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होतं. याच पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारही घडला. त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर या घटनेवेळी तैनात असणारे 11 पोलिस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….