‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, पत्रकार परिषद घेत अजित पवारांकडून सरकारवर हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय.
सर्वच क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. साहित्य क्षेत्रातही सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. सरकारने अशी ढवळाढवळ करू नये, असं अजित पवार(Ajit Pawar) म्हणालेत.
कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केला. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला.त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. आज अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत निषेध केलाय.
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करून सरकार अघोषित आणीबाणी तयार करत आहे, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…