“ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे…?” किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला सवाल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्याअनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमकतेने विविध आरोप करताहेत. ‘ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे ?’ असा सवाल आता सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांनी याबाबत एक ट्विट देखील केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये सोमय्या म्हणतात,”ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे ? अन्वय नाईकनी २००९ मध्ये १९ बंगले बांधले, ठाकरे परिवाराने २०१४ मध्ये विकत घेतले, नावावर केले, ८ वर्ष प्रॉपर्टी टेक्स भरल. आम्ही हा घोटाळा उघडकीस आणला नंतर ठाकरे सरकारने बंगले गायब केले ?” असा आरोप सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केला आहे. तसेच आज १२ वाजता अलिबाग येथे CEO ना भेटणार असल्याचे देखील सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या भ्रष्टाचाराविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असल्याचे आव्हान त्या वेळी सोमय्या यांनी वारंवार दिले होते. आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी २०१९ मधील एका प्रकरणाची आठवण करून देत ट्विट केले आहे. अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सोमय्या आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….