सीएम शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंनिसकडून टीकास्त्र…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (बुधवारी) सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांनी यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येते. तसेच साईदर्शनानंतर ते सिन्नरच्या मिरगावात गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.
यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर असताना मिरगाव सिन्नरमधील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचं बोललं जातं आहे. हे खरं असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंनिस करते,’ असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणालेत.
ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचं सिद्ध केलं तर आम्ही 21 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे’. मुख्यमंत्र्यांच्या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे,’ असा आरोपही अनिंसने यावेळी केला आहे. ‘थोतांड विषयाकडे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने वळावं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र अंनिस याचा निषेध करते,’ असं महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यांनी म्हंटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून आपले भविष्य पहिले का हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….