पॉलिटिक्स स्पेशलचा दणका : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली दाखल चाळीस गावांना जोडणाऱ्या वाकोडी ते मोरथ पुल कंत्राटदाराला १८ महिन्याचा दंड आणि ८ महिन्यात काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम चे आदेश मोरथ ते मोरथ फाटा कामालाही आजपासून सुरवात ; बि.के.कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठा झटका
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव
बहुप्रतीक्षित असलेला वाकोडी ते मोरथ ला जोडणारा पूल कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडला होता.त्याची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.वादग्रस्त ठरलेल्या बि.के. कन्स्ट्रक्शन कंपनीला १८महिन्याचा दंड आणि ८ महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे.रखडलेल्या पुलाची पार्श्वभूमी आणि कंत्राटदाराचा प्रताप ग्रामस्थांनी पॉलिटिक्स स्पेशल कडे मांडला होता.त्या आधारे “पॉलिटिक्स स्पेशल”ने मागील अंकात(ता.१४) “चाळीस गावांना जोडणारा मोरथ ते वाकोडी पूल कंत्राटदारामुळे रखडला” या मथळ्याखाली जनहितार्थ बातमी प्रकाशित केली होती.या बातमीचा हवाला देत गावकऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन गाठले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॉलिटिक्स स्पेशल मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दाखल घेवून वादग्रस्त असलेल्या बि.के.कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठा झटका दिला आहे. सदर वादग्रस्त कंपनीला तब्बल १८ महीन्याचा दंड आणि ८ महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.त्याचबरोबर पॉलिटिक्स स्पेशल मधील बातमीनंतर मोरथ ते मोरथ फाटा या ३ किमी अंतराराच्या रखडलेल्या कामाला तात्काळ सुरवात करण्यात आल्याने ठेकेदारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
(पॉलिटिक्स स्पेशल अंकातील मोरथ ते वाकोडी रस्त्यावरील पुलाच्या बातमीचे वाचन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
महागाव तालुक्य्यातील मोरथ ते वाकोडी दरम्यान पूस नदीचा प्रवाह आहे.या नदीवर पूल नसल्याने शेतकरी विध्यार्थी आणि गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा करावा लागत होता.त्यामुळे मोरथ ते वाकोडीला जोडणारा पुल व्हावा अशी मागणी गावकऱ्यांची होती.केंद्रीय मंत्री तथा विकास पुरुष नामदार गडकरी यांचे निकवर्तीय तथा मोरथ चे भूमिपुत्र सचिन कोळसकर गावात आले कि गावकरी त्यांना या पुलाची बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे. त्यांनी हि बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली .त्यामुळे पुलाच्या बांधकामास ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला .व २०१९ ला हे कंत्राट पुसद येथील वादग्रस्त असलेल्या बी के कंपनीला देण्यात आले.याच कालवधीत कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आले.सदर पुलासाठी ४८ गुंठे जमीन अधिग्रहण करण्यात आली.लवकरच पूल पूर्ण होईल आणि आपली समस्या सुटेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला होता.
परंतु चाळीस गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था कायम राहिली. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मागील चार वर्षापासून पुलाचे काम रखडले .नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाशी चर्चा करूनही फलित प्राप्त झाले नाही.दरम्यान पॉलिटिक्स स्पेशलने वाकोडी ते मोरथ ला जोडणाऱ्या पुलाची अवस्था आणि अधिकारी व कंत्राटदार यांच्या मिलीभगत प्रतापाचा लेखाजोगा तंतोतंत आणि वास्तव सत्य मागील अंकात प्रकशित केला होता.गावकऱ्यांनी पॉलिटिक्स स्पेशल वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाचे दालन गाठले.पॉलिटिक्स स्पेशल वृत्तपत्रात आलेली बातमीचे वृत्तपत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाचनास दिले.नागरिकांची होणारी हेळसांड आणि गैरसोयी ची गंभीर दखल घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.सोबतच मोरथ ते वाकोडी या ३ किमी रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे या कामाची सुरवातही आजपासून करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.पॉलिटिक्स स्पेशलने वाकोडी आणि मोरथ या पुलाचा कामाच्या संदर्भात दिलेल्या लढ्यासोबतची साथ बाबत गावकऱ्यांनी पॉलिटिक्स स्पेशल चे आभारही मानले आहे.
दर दिवशी दंडाची तरतूद : कार्यकारी अभियंता पुजारी
पुसद सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी पॉलिटिक्स स्पेशल शी बोलताना म्हणाले की ,दर दिवशी दंडाची तरतूद आहे. त्यानुसार दंड आकारणी सुरू आहे.अशी कामे करणाऱ्या खपवून घेणार नाही.