अमृतसरसह पंजाबच्या काही भागात भूकंपाचा जोरदार धक्का, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमृतसर :- अमृतसरसह पंजाबच्या (Panjab) काही भागात आज सकाळी 3:42 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाब, पाकिस्तानमध्ये होता.
भूकंपाची खोली 120 किमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी शनिवारी नेपाळमध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) ते उत्तराखंडपर्यंत जाणवले . हा भूकंप उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पूर्व-दक्षिणपूर्व 101 किमी अंतरावर झाला. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याआधी, शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजता उत्तराखंडमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू पौरी गढवाल प्रदेशात होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंड-नेपाळ सीमेला लागून असलेल्या हिमालयीन प्रदेशात वेगवेगळ्या तीव्रतेचे किमान आठ भूकंप झाले आहेत. पिथौरागढचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बीएस महार यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या सिलांग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर होता, मात्र त्याचे धक्के भारत, चीन आणि नेपाळमध्ये जाणवले.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….