भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- भारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी आखाडा बाळापूर येथील सकाळच्या सत्रात फेटे बांधून सहभाग नोंदविला.
नफरत छोडो , भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती.
खा. राहुल गांधी साडे सहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे फेटेधारी कोल्हापूरकर स्वागतासाठी सज्ज होते. गुलाबी थंडीत सकाळच्या वेळी रस्त्यावर दुतर्फा यांची भली मोठी रांग पहायला मिळाली. तर आमच ठरलय असे बॅनर्सही त्यांच्या हातात झळकत होते. बसमधून ही मंडळी भल्या पहाटेच येथे दाखल झाली होती. त्यानंतर तेथे सर्वांना फेटे बांधण्यात आले.
पुरोगामी शाहू महाराजांचा विचार राहुल गांधी पुढे नेताहेत
छत्रपती शाहू महाराज या कर्तृत्वान राजाची पुरोगामी राजा म्हणून ओळख होती. त्यांनी समतेचा विचार दिला. तोच विचार पुढे घेऊन राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. त्यामुळे आम्ही दहा हजार कोल्हापूरकर या यात्रेत सहभागी झाल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….