राज्यात उद्धव गटाचा, तर देशभरात सातपैकी तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशातील 6 राज्यांतील अनेक जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या सात विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते.
त्यानंतर आज याचे निकाल समोर आले आहे. यामध्ये बिहारमधील 2 आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, ओडिशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तर हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे आणि ओडिशातील धामनगर जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.
देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोकामामध्ये आरजेडी आणि अंधेरीच्या जागेवर उद्धव गटाने बाजी मारली आहे. बिहारमधील गोपालगंज, उत्तर प्रदेशमधील गोला गोकरनाथ आणि हरियाणातील आदमपूरमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तेलंगणातील मुनुगोडेमध्ये टीआरएस आघाडीवर आहे. तर ओडिशातील धामनगर जागेवर भाजप आघाडीवर आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…