भाजपला केवळ काँग्रेसच आव्हान देऊ शकतं ; पक्ष सोडून गेलेल्या आझाद यांचं विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
श्रीनगर :- आम आदमी पक्ष (आप) हा ‘केवळ केंद्रशासित प्रदेश दिल्लीचा पक्ष आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ काँग्रेसच भारतीय जनता पक्षाला (भाजप) आव्हान देऊ शकते, असे मत काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाबरोबरच्या अनेक दशके काम करून बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच आझाद यांनी म्हटलं होतं की, ते धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात नसून कमकुवत पक्षव्यवस्थेच्या विरोधात आहेत.
श्रीनगर येथे एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, “मी काँग्रेसपासून विभक्त झालो असलो तरी मी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात नव्हतो. केवळ पक्षाची व्यवस्था कमकुवत झाल्यामुळेच मी बाहेर पडलो. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी करावी अशी माझी अजूनही इच्छा आहे. तर भाजपला आव्हान देण्यासाठी ‘आप’ सक्षम नाही, असंही ते म्हणाले.

काँग्रेसवर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, पक्षाने हिंदू, मुस्लिम आणि शेतकऱ्यांनी अनेक वर्षे काम केलं. आम आदमी पार्टी या राज्यांमध्ये काहीही करू शकत नाही, पंजाबमध्ये ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पंजाबची जनता त्यांना पुन्हा मतदान करणार नाही, असंही ते म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….