शिवसेना आमच्यामुळेच फुटली ; आदित्य ठाकरेंची मोठी कबुली…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेत जी फूट पडली या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनी ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ”उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.
“राजकारण हे फार घाणेरडे ठिकाण नाही, किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी चिखलात जावे लागत नाही, असे आम्हाला वाटत होते. पण ती आमची चूक होती. असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं. मध्यावधीसाठी भाजपला दोष देणार का, असा सवाल त्यांनी केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासारखे घाणेरडे राजकारण करत नाही.
सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही,” असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….