डोळा काळा निळा झाला, डोक्याला मार लागला ; नितीन राऊतांना नेमके झालेय काय….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि माजी उर्जामंत्री नितीन राऊत यांचा रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा एक डोळा काळा-निळा पडला असून त्यांच्या डोक्याला बँडेड लावल्याचे दिसून येत आहे.
नितीन राऊत हे जखमी झाले असून त्यांचा जखमी अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.
नितीन राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी तेलंगाणा इथे गेले आहेत. राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत असून ही यात्रा बुधवारी तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथून पुढे निघाली आहे. नितीन राऊत हे यात्रेत सहभागी झाले असता त्याने एका पोलिसाने धक्का दिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसाचा धक्का लागल्याने नितीन राऊत पडले आणि ते जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नितीन राऊत यांच्या डोळ्याला हाताला आणि पायाला मार लागला असून त्यांना हैदराबादमधील वसावी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारत जोडो यात्रेत सामील झाली पूजा भट्ट
काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका पूजा भट्ट ही देखील सामील झाली होती. ही यात्रा सध्या तेलंगाणा इथे पोहोचली असून तेलंगाणाची राजधानी असलेल्या हैदराबाद इथून या यात्रेने बुधवारी पुढील वाटचाल सुरू केली आहे. बुधवारी पूजा भट्ट ही देखील या यात्रेत सामील झाली होती आणि तिने राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर पायी पार केलं. यावेळी या दोघांमध्ये थोडावेळ चर्चाही झाली. 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली असून ही यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर अशी असणार आहे. 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. जवळपास 150 दिवसांची ही यात्रा असून या यात्रेमध्ये राहुल गांधी 3750 किलोमीटर चालणार आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….