उद्यापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे तारांकित हॉटेलमध्ये शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर मंथन, असा आहे कार्यक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील राजकीय पक्षांपैकी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष मंथन करणार आहे. शिर्डी येथील तारांकित हॉटेलात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित मंथन शिबिर पार पडणार आहे.
उद्यापासून म्हणजेच 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत हे शिबिर होणार आहे. किमान ४० महत्त्वाचे नेते मार्गदर्शन करणार आहे. या शिबिरात जवळपास 1800 हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहे. या शिबिरात शेतकऱ्यांच्या दृष्टीने ओला दुष्काळ, कर्ज, परराज्यामध्ये पळवले जाणारे प्रकल्प, अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शिबिराला येणाऱ्या जवळपास 400 नेत्यांसाठी तारांकित हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि कार्यकर्त्यांना भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सत्तेवरुन पाऊउतार झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पहिल्यांदाच असे मंथन शिबिर घेत आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने या शिबिरातून ग्रामीण भागातील प्रश्नावर लक्ष केंद्रित केले असून यावर शिबिरात अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या सव्वा वर्षावर येऊन ठेपली आहे, सत्ता गेल्यानंतर पक्षफुटण्याची भीती यासाठी हे मंथन शिबिर महत्वाचे आहे.
पक्षबांधणी आणि आंदोलने ठरवण्यासाठी शिर्डीतील सन अँड सँड हॉटेलात हे अधिवेशन होणार आहे.
या शिबिरात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा निरीक्षक, माजी मंत्री, विद्यमान आणि माजी खासदार, आमदारांचा समावेश आहे.
यामध्ये प्रदेश अधिवेशन असल्याचे कारण देत शिर्डीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.
एकूणच शिर्डी येथे होणाऱ्या मंथन शिबिराबाबत वरिष्ठ पातळीवरुनच सर्व निर्णय होत असल्याने दबक्या आवाजात मोठी चर्चा आहे.