राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार….?, राजकीय आखाडा तापण्याची शक्यता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यात डिसेंबर महिन्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेवरून सध्या भाजपाचे खासदार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आणि माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात वाद रंगला आहे.
त्यातच या स्पर्धेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे राजकीय फड रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २० ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहतील. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव तेव्हा दौरा रद्द केला होता. पण, बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणती भूमिका घेते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. त्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांनी माफी मागावी. अन्यथा उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….