पुण्यातील वारजे परिसरात जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यातील येरवडा शास्त्रीचौकात शिवनेरी बसने अचानक पेट घेतला. यवतमाळ ते चिंचवड या एस टी विभागाच्या शिवशाई बस ने पेट घेतला. गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 42 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक घेतला पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
दिल्लीत नरेलामधील प्लॅस्टिक कारखान्याला आग
दिल्लीत नरेलामधील प्लॅस्टिक कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. कारखान्यात लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या आगीमद्धे दोघांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात भाडणं सोडवणाऱ्या महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस उपनिरीक्षक हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते मात्र तिथे एका इसमांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा बायकोचे भांडण सोडवत असताना पतीचा राग अनावर झाला आणि त्याने थेट महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली व पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घातला.
दिवाळीच्या दिवसात पुण्यात चोरट्यांनी घरफोड्या करत लंपास केले 52 लाख रुपये
दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेक फ्लॅट, दुकाने बंद होती याचाच फायदा या चोरट्यांनी उचलला आणि ८ दिवसात १२ हून अधिक घरफोड्या पुण्यात झाल्या आहेत. शहरात ऑक्टोबर २३ ते ऑक्टोबर २९ दरम्यान शहरात १२ हून अधिक घरफोड्या करत चोरट्यांनी ५२ लाख रुपये पळवले आहेत. बंद फ्लॅट नव्हे तर दुकानांना देखील चोरट्यांनी टारगेट केले होते. १२ घरफोड्या मध्ये मात्र अद्याप एकाही आरोपीला पोलिसांकडून अटक झालेली नाही.
शिंदे-ठाकरे गटाला चार आठवड्याची मुदत; पुढील सुनावणी चार आठवडयानंतर
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात झाली. यावेळी दोन्ही गटांना 4 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. आता पुढील सुनावणी 4 आठवडयानंतर होणार आहे.
शेअर बाजारात उत्साह, खरेदीचा जोर, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार
आज शेअर बाजारात सेन्सेक्स 344 अंकाच्या तेजीसह 61,083 वर सुरू झाला तर निफ्टी 108 अंकाच्या तेजीसह 18,120 वर सुरू झाला. आज सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तब्बल ४० दिवसांनंतर प्रकरण आज न्यायालयाच्या कामकाजात पहिल्या क्रमांकावर घेण्यात आलं आहे. त्यामुळं आज सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास प्रकरणावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची घातला हैदोस
इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या हीच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस घातला आहे. मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा प्रेक्षकांनी केला तर प्रेक्षक झाडावर बसल्याने झाडे देखील मोडली आहेत.
सीटबेल्ट संदर्भात आजपासून नाही तर 11नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई होणार
मुंबईत अनेक कारचालकांनी अजूनही मागच्या सीटवर सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट संदर्भात आज पासून फक्त समज दिला जाणार असून 11 नोव्हेंबर पर्यंत सीटबेल्टकरता मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग
पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोण पसरत आहे. आग इतकी भीषण की टेरेस मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महागाईतून दिलासा, LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.
अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं लक्ष
आज अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.