म्हणून , राहुल गांधींनी माझा हात पकडला ; ट्रोलर्सना पूनम कौरचं सडेतोड उत्तर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्यामुळं काँग्रेस नेते राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्यामुळं काँग्रेस नेते राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
तेलंगणातील भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी अभिनेत्री पूनम कौरचा हात धरताना दिसले, त्यानंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी त्यांच्या ट्विट हँडलवर राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) आणि पूनम कौर यांचा हात धरलेला फोटो शेअर केला आणि म्हटलं की, ‘ते (राहुल गांधी) त्यांचे पणजोबा (माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू) यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत.’
मात्र, आता अभिनेत्री पूनम कौरनं स्वतः सांगितलंय की, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तिचा हात का धरला होता. ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना पूनम कौर म्हणाली, मी चालत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली कोसळणार, तोच राहुल गांधींनी माझा हात धरला, असं तिनं सांगितलंय. भाजप नेत्या प्रीती गांधी (Preeti Gandhi) यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना पूनम कौरनं म्हटलंय की, “हा पूर्णपणे अपमान आहे. लक्षात ठेवा, पंतप्रधान नारी शक्तीबद्दल बोलताहेत आणि आपण..? मी चालत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली कोसळणार, तोच सरांनी (राहुल गांधी) माझा हात पकडला.”
काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी भाजप (BJP) नेत्याच्या या वक्तव्याबद्दल त्यांना फटकारलं आणि त्यांना विकृत महिला म्हटलं. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या, राहुल गांधी खरोखरच त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाला एकत्र आणत आहेत. पवन खेरा यांनी लिहिलंय, ‘तुम्हाला उपचारांची गरज आहे, तुमची मानसिक स्थिती तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हानिकारक ठरू शकते.’