1 नोव्हेंबरला ट्रेलर, तर 15 दिवसांनी पिक्चर दाखवेन : थेट शिंदे-फडणविसांना इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील मागील काही दिवसांपासून सुरू असलेला घमासान संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत. कडू यांनी आता राणांना थेट आव्हानच दिले आहे.
आता रवी राणा यांच्यासोबत आरपारची लढाई असल्याचे कडूंनी सांगितले आहे. 1 नोव्हेंबरला तर ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दाखवू, असा इशाराच कडूंनी दिला आहे.
शिंदे फडणवीसांनी याबाबत समोर यायला पाहिजे, स्पष्टीकरण दिले पाहिजे. हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वच धोक्यात येत असेल तर बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. आपण फुसका बार आहे की बॉम्ब आहे, 1 तारखेला दाखवू. फटाके 1 तारखेला वाजणारच, असे आवाहन त्यांनी थेट शिंदे फटणवीसांना दिला.
दरम्यान, “दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे,” असे टि्वट रवी राणा यांनी केले आहे. त्याला बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “एक तारखेला ट्रेलर दिसेल. आणि पंधरा दिवसांनी पिक्चरही दाखवू,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….