शाखेचा ताबा घेण्यावरुन ऐन दिवाळीत ठाकरे-शिंदे गटात राडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
डोंबिवली :- डोंबिवलीमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर ताबा घेण्यावरुन पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे गटात वाद झाला आहे.
त्यामुळे ऐन दिवाळीत शिवसेनेच्या दोन्ही गटात फटाके वाजले आहेत. दरम्यान दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळताच पोलीसांनी (Police) घटनास्थळी दाखल होतं परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यापासून त्यांच्या गटाने शिवसेनेवर आपला दावा सांगितला आहे. यासाठी शिंदे गटाकडून सर्वात पहिल्यांदा शिवसेनेच्या शाखेवर आपला दावा केला होता. शाखा हे शिवसेनेचा महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. त्यामुले शाखांवरती आपलं नियंत्रण रहावं यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केले जात आहेत.
मागील महिण्यात ठाण्यातील (Thane) शाखेवर देखील दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता त्यावेळी देखील शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला होता. अशातच आता डोंबिवलीमधील (Dombivli) शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचे अधिकृत रजिस्टेशन केली असल्याची माहिती शिंदे गटाकडून पत्रकारांना देण्यात आली आहे.
दरम्यान, 14 ऑक्टोबर रोजी हे रजिस्ट्रेशन वर्धमान इंटरप्रायजेस आणि शिंदे गटातील समर्थक जितेन पाटील यांच्यात झाल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. तर उद्धव ठाकरे गटातील महिला पदाधिकारी शिल्पा मोरे यांनी पोलिसांसमोर शाखेच्या परिसरात जोरदार आरडाओरड करायला सुरुवात केली होती. त्यामुळे शाखेवर सध्या शिंदे गटाने दावा केला असला तरी ठाकरे गटाने तो दावा मान्य केलेला नाही.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….