‘मी नाही तर 50 आमदार नाराज, मंत्रिपद नाही हे आहे कारण,’ बच्चू कडूंचा गौप्यस्फोट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला आहे.
50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे. ‘महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील 50 आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले.
त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या 50 आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत,’ असं बच्चू कडू म्हणाले. ‘विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो, त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत’, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली. ‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही.
त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे. 50 आमदार नाराज रवी राणा यांच्यामुळे केवळ मीच नाही तर सगळे 50 आमदार नाराज झाले आहेत. अनेकांनी मला फोन करुन याबाबत त्यांची भूमिका मांडली.
राणा यांचे आरोप हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे आहेत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ‘रवी राणा हे आपण देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्या जवळचे आहोत, असं सांगतात, त्यामुळे या आरोपांमागे कुणाची फूस तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं आणि स्टंटबाज रवी राणा यांना समज द्यावा,’ अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मला योग्य तो न्याय देतील, अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केली. माझ्या मागणीवर 1 तारखेपर्यंत विचार केला नाही तर आम्ही आमची भूमिका घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….