माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्दयविकाराने निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यातील शिवाजीनगरचे शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज (ता.२६ ऑक्टोबर) दुपारी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे.
माजी आमदार विनायक निम्हण आज दुपारी ह्दयाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर कुटुंबीयांना त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातच ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीत निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज रात्री उशिरा त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निम्हण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा, तर काँग्रेसकडून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या शिवसेनेत होते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….