आपल्या सर्वांसाठी आम्ही शिवधनुष्य पेललं ; मुख्यमंत्री शिंदेंचं विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त जनतेशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सरकारने मागील तीन ते चार महिन्यात राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली.
तसेच आगामी काळातील प्रकल्पांशी संबंधीत माहिती शिंदे यांनी दिली.
आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विविध योजनांना गती देण्याचा प्रयत्न केला. सरकारला आणखी मजल गाठायची आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राकडे सर्व आशेने पाहात आहेत. आपल्या सर्वांसाठी आम्ही हे शिवधनुष्य पेललं आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, समाजकारण आणि राजकारण यामध्ये समाजकारणाला प्राधान्य द्या. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचितांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे. हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आमची वाटचाल देखील अशीच सुरू असल्याचही शिंदे म्हणाले.
आपण ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवास मोफत केला आहे. दिवाळीसाठी सामान्यांना आनंदाचा शिधा दिला. आपत्तीग्रस्तांना भरघोस मदत केली. यामुळे ३० लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेणाऱ्यांना कर्जमाफी दिली. तसेच प्रोत्साहनपर अनुदानही दिल्याचं, शिंदे म्हणाले.
राज्यातील ७५ हजार पदाच्या भरतीची घोषणा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहे. चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शुभारंभ लवकरच आपण करणार आहोत, असही शिंदे यांनी म्हटलं. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पोलिस भरती यासाठी प्रयत्नशील असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळविणाऱ्यांना खेळाडूंना मदत करणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….