“भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाण्यात शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी भारत पाकिस्तान मॅचचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली. तसंच दिवाळीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छाही दिल्या.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
भारत पाकिस्तान मॅचसारखीच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो. दिवाळीसोबत काल भारताने पाकिस्तानविरूद्ध सामना जिंकला, त्याचा आनंद आपण आज साजरा केला. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल. मेलबर्नच्या मैदानातही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बोर्ड झळकला होता. कालचा सामना भारताने जसा जिंकला. तसाच सामना आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलो. आमचा सामना महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच आधी आपली परंपरा, संस्कृती, सण उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विकासासोबत या गोष्टीही आवश्यक आहेत. माणसाचं मन प्रसन्न असेल तर त्याला पुढे जाता येतं. या राज्यात आता परिवर्तनाचं पर्व सुरू झालं आहे. आज मी ज्या ठिकाणी जातो तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. या गोष्टीचं आम्हाला समाधान आणि आनंदही वाटतो त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….