‘ते मैदानात जिंकले, अन् तुम्ही…’, एकनाथ शिंदेंच्या ‘बॅटिंग’वर ठाकरेंच्या शिलेदाराचा यॉर्कर….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. टीम इंडियाने मिळवलेल्या या विजयाचे पडसाद राजकारणातही उमटले आहेत. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मॅचचा उल्लेख केला.
‘काल टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकली, तशीच मॅच आम्ही तीन महिन्यांपूर्वी जिंकली होती. राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आणि राज्यात विकासाचं पर्व सुरू झालं,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे. काय म्हणाले अरविंद सावंत? ‘गद्दारीचा पराक्रम त्यांनी केला असेल.
विराट कोहलीची बॅटिंग देश जिंकण्यासाठी होती. उभ्या भारताला अभिमान वाटेल, असा तो कालचा दिवस होता. ते तुमच्यासारखे मैदान सोडून पळाले नव्हते. ते मैदानात खेळले आणि मैदानात जिंकले.
तुम्ही मैदान सोडून पळालेली माणसं आहात. पाठीत सुरा खुपसलेली माणसं आहात, त्यामुळे गद्दारांनी आपली तुलना त्यांच्याशी करू नये, ते असं करत असतील तर त्याच्यासारखा विनोद नाही, हे हास्यास्पद आहे’, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंची बॅटिंग ‘देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ठरवलं, सर्व सण साजरे करायचे.
मग गोविंदा असेल, दसरा असेल किंवा दिवाळी असेल. आपण इंडिया पाकिस्तानची मॅच जिंकली. काय जल्लोष केला काल सर्वांनी. मेलबॉर्न स्टेडिअमवर बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली होती.
कुणाच्या तरी हातात, आमच्या पक्षाचे बॅनर होते’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. काल झालेल्या मेलबर्न स्टेडियमवर सामन्यादरम्यान, एक कार्यकर्ता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पोस्टर घेऊन उभा असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ‘वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे – बाळासाहेबांची शिवसेना दिवा शहर’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिला होता. या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….