क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्सव व बिरसा पर्व चे भव्य दिव्य आयोजन ; क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी पांडुरंग व्यवहारे यांची निवड ; क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती गठीत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आद्य क्रांतिकारक महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग व्यवहारे यांची सर्व आदिवासी समाजाच्या वतीने निवड करण्यात आली. या समिती द्वारे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती रॅली व तीन दिवसीय बिरसा पर्वाचे आयोजन करविण्यासंबंधी आज महात्मा मुंगसाजी विद्यालयातील सभागृहात सर्व सामाजिक संघटना समाज बांधवांच्या वतीने एकमताने निर्णय घेण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सव मोठ्या हर्षउल्हासाने साजरी करण्यासोबतच आदिवासी समाजाची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने महामानवांच्या विचाराची पेरणी करण्याच्या उदात्त हेतूने क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती रॅली व तीन दिवसीय बिरसा पर्वाचे आयोजन पुसद पंचायत समिती येथे ११ ते १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या जयंती उत्सव सोहळ्याच्या आयोजन, नियोजन व यशस्वीतेसाठी समिती गठीत करण्यासंदर्भात पुसद येथील महात्मा मुंगसाजी विद्यालयातील सभागृहात सर्व आदिवासी समाज बांधवांची सभा घेण्यात आली.
यामध्ये सर्व सामाजिक संघटना चे पदाधिकारी आदिवासी सेवक व आदिवासी समाजाच्या वतीने एकमताने क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उत्सव समितीचे सचिव पदी आदिवासी विकास परिषदेचे महासचिव ॲड रामदास भडंगे तसेच आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष भास्कर मुखाडे यांची समितीचे कोषाध्यक्ष पद सोपवण्यात आले. तसेच आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांची समितीचे सहअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉक्टर हरिभाऊ फुपाटे (आदिवासी कर्मचारी संघटना अध्यक्ष), मारोती भस्मे (बिरसा ब्रिगेड अध्यक्ष), वर्षाताई वैद्य (महात्मा मुंगसाजी पतसंस्था अध्यक्ष), सुनील ढाले (आदिवासी विकास परिषद युवा जिल्हाध्यक्ष), दादाराव चिरंगे ( बिरसा क्रांती दल अध्यक्ष), आदिवासी कर्मचारी संघटना सचिव संदेश पांडे, अफ्रोट संघटना सचिव किसन भुरके, महिला बिरसा ब्रिगेडचे सुनीताताई मळघने व मनीषा बेले तसेच आदिवासी विकास परिषदेचे गजानन टारफे व देविदास डाखोरे, बिरसा क्रांती दलचे गणेश वानोळे, महात्मा मुंगसाजी पतसंस्थेचे किरण मिरासे, नवतरुण कर्मचारी संघटनेचे संदीप व्यवहारे व संतोष इंगळे यांची सर्वांनुमतेमते निवड करण्यात आली.
तसेच उत्सव समितीचे सल्लागार म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे, परसराम डवरे व गजानन उघडे, आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, नारायण कऱ्हाळे व शामराव व्यवहारे, माजी समाज कल्याण सहा आयुक्त माधवराव वैद्य, माजी शिक्षणाधिकारी रंगराव काळे, शालिकराव हगवणे यांची सहमतीने निवड करण्यात आली.
तर प्रसिद्धी समितीमध्ये मारोती भस्मे, शंकर माहुरे, संतोष गारूळे, ज्ञानेश्वर मेटकर, राजु पेदेवाड यांची निवड करण्यात आली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….