आमदारावर अखदलपात्र गुन्हा दाखल ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फाेन, वाद मिटणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खूद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पुढाकार घ्यावा लागला आहे.
या दाेन्ही नेत्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी फाेन केल्याची चर्चा आहे. लवकरच चाैघांमध्ये बैठक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर रविवारी बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी राणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पाेहचली आहे. यानंतर दाेन्ही नेत्यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याना फाेन केल्याचे समजते. दिवाळीनंतर दाेन्ही नेते बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यासमवेत एक बैठक घेऊन वादावर पडदा टाकणार असल्याचे समजते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….