उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वीच दिग्गज नेत्याची पक्षातून हकालपट्टी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचं काम करत असताना क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांचा फोटो लावला नाही. मुंबईत कधी त्यांची भेटही घेतली नाही. नुकत्याच झालेल्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे याचं नावही घेतलं नाही. ही खंत वाटल्याने क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पाटील यांनी म्हटलं.
मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परंतु शेतकऱ्यांना ठोस मदत झाली नाही. आता शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्याआधीच बड्या नेत्याची हकालपट्टी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
जयदत्त क्षीरसागर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र त्यांना त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….