यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोड यांची नियुक्ती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यात यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बनसोड हे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण नंतर सिंधुदुर्ग येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
राज्यातील २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी उशिरा निघाले होते.त्यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक पदी गौरव सिंह यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही वेळातच त्यांच्या बदलीवर स्थगिती देत डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांना पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे आदेश धडकले होते.मात्र पुन्हा आता शुक्रवारी रात्री नव्याने आता नवीन शासन आदेश निघाले आहे.त्यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यरत असलेले पवन बनसोड यांची यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.