पुसद प्रीमियर लीग फुटबॉल मैच चे आयोजन….…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघटना व चेतना क्रीडा मंडळ द्वारे आयोजित स्वर्गीय ए.डी खान स्मृती प्रित्यर्थ पुसद प्रीमियर लीग आयोजन स्थानिक फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर आज पासून सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघाचा समावेश असून त्यामध्ये राज नाईक फुटबॉल संघ, पुसद युनायटेड, बीएस कन्सल्टन्सी, एस एस फुटबॉल संघ, अल रजा फुटबॉल संघ, माऊली वारकरी, स्टार फुटबॉल क्लब, व चेतना क्रीडा मंडळ या संघाचा समावेश असून सामने साखळी पद्धतीने खेळविल्या जाणार आहे.

तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही बी कुलकर्णी साहेब, पीएसआय जगदीश मिश्रा साहेब, एडवोकेट उमाकांत पापिनवर, अजय पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले असून ही स्पर्धा दहा दिवस साखळी पद्धतीने खेळण्यात येणार आहे या स्पर्धेच्या यशस्वी ते करिता चेतना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वीरेंद्र राजे, सचिव सुशील दीक्षित, शेख मकसूद, गफार खान आतिश, अखिल सर, भगवान पवार, समीर खान, ज्ञानेश्वर गादेकर, गफार कुरेशी, लतीफ गौरी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धेचे सामना अधिकारी म्हणून अनिस भाई चव्हाण तर पंच सोहेल मांजरे वसीम हाश्मी, अब्दुल्ला, सलमान भाई काम पाहत असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम मुराडी यांनी केले तर आभार शेख मकसूद यांनी मानले

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….