शरद पवारांच्या गुगलीने उद्धव ठाकरे पुन्हा बाद होतील ; केंद्रीय मंत्र्यांचं विधान……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीच्या निमित्ताने कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे एकत्र आले.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राजकारणात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र त्यातच केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय गुगली टाकल्याचा दावा करत रामदास आठवले यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. आठवले म्हणाले की, राजकारणात काहीही अशक्य नाही. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही चांगले खेळाडू आहेत. दोघांनाही त्यांचा खेळ चांगल्या प्रकारे माहित आहे,
क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील खेळी पवारांचा मास्टर स्ट्रोक नाही का, असं विचारलं असता आठवले म्हणाले की, ही खेळी म्हणजे राजकीय गुगली आहे. या गुगलीने उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बोल्ड होतील. आधी एकनाथ शिंदे यांनीच त्यांना बाद केले. आता पवार त्यांना पुन्हा बाद करतील, असंही आठवले म्हणाले.
दरम्यान शरद पवार यांनी एनडीएमध्ये यायला हवं. त्यांनी नरेंद्र मोदींसोबत यावे. मी इथे आहे, मग पवारांनी का दूर असावं असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….