चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज, रुपाली ठोंबरेंची जोरदार टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- खेडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू असं वक्तव्य केलं.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीकेचा बाण सोडत त्यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं.
“भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोणीतरी उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा. सातत्याने त्यांना घड्याळ बंद पाडू, महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही, हे त्यांचं झटक्याचं जे लक्षण आहे त्यावर त्वरित उपचाराची गरज आहे,” असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचली पाहिजे, दिवाळीच्या मुहुर्तावर अन्नधान्याचे किट मिळाले पाहिजे असे प्रश्न न सोडवता, त्यांना जे सातत्याने झटके येतायत त्वार उपचार होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. २०२४ मध्ये राष्ट्रवादी अर्धीही राहणार नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….