मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजांना संधी, धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- 2019 ला विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानपरिषदेच्या उमेदवारीतही त्यांना डावलण्यात आलं.
त्यानंतर भाजपने त्यांना सक्रीय राजकारणातून दूर केल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यातच आता येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावर पंकजा यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले…
मंत्रिमंडळ दुसरी यादी जाहीर होणार आहे. पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्याची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का? असं त्यांना विचारायला हवं, असं धनंजय मुंडे म्हणालेत.
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यावरून शिंदे सरकारवर टीका झाली. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना संधी मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना स्थान मिळू शकतं. यात पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यावरही धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय.
शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली अजून पंचनामे झाले नाहीत. सर्वात जास्त फटका विदर्भ-मराठवाड्याला बसलाय. गेल्या वर्षीही अशी परिस्थिती झाली होती. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शिंदे सरकारनेही मदत केली पाहिजे, असं मुंडे म्हणालेत.
सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही. तर स्वतःच्या हितासाठी आलं आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….