मुरजी पटेलांच्या माघारीनंतर लटकेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची नवी खेळी….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हापासून ते निवडणुक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडींना वेग आला होता. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर आणि राजकीय घडामोडी घडल्यानंतर अखेरीस भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुक अर्ज मागे घेतला.
मुरजी पटेल यांच्या माघार घेण्यानंतरही अंधेरी पोटनिवडणुकीचा वाद कायम आहे.
मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा आता आरोप केला जात आहे. यासंबधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये ठाकरे गटाविरोधात ‘नोटा’च्या बटणाचा प्लॅन बनवला जात असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ‘नोटा’ला मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. या ऑडिओ क्लीपमधील आवाज हा मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावा केला जातोय. 3 तारखेला मतदानावेळी ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी खेळली जाणार असल्याचे या कार्यकर्त्याच्या बोलवण्यावरुन समोर येत आहे. भाजपच्या मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ‘नोटा’तून रोष व्यक्त करू असे आवाहन यामधून केले जात आहे.
या निवडणुकीत काका (मुरजी पटेल) नाहीत. कमळाचे चिन्ह नाही पण नोटाचे बटन तर आहे. ‘नोटा’द्वारे रेकॉर्ड मतदान करण्याचे आवाहन या क्लीपमध्ये करण्यात आले आहे. या पोट निवडणुकीसाठी एकूण 14 जणांनी अर्ज भरले होते. त्यातील 7 जणांनी माघार घेतली आहे. 7 जणांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऋतुजा लटके यांच्यासह सहा उमेद्वार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….