भाजपला धक्का, शाहू घराण्यातील युवराज शिवबंधनात अडकणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी गळती लागली आहे. अनेक आमदार आणि खासदार हे शिंदे गटात दाखल झाले आहे. पण आता शिवसेनेनं भाजपला धक्का दिला आहे.
शाहू घराण्यातील युवराज आणि भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यशवर्धन राजवर्धन कदमबांडे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन राजवर्धन कदमबांडे आज मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजवर्धन कदमबांडे धुळे जिल्ह्यातील राजकारणातील मोठे प्रस्थ मानले जातात. त्यांचे युवराज भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिक बळ मिळणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश करत आहे.
मंगळवारी सुद्धा बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील शिवसैनिक, पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव तसंच संजय गायकवाड, संजय रायमूलकर हे दोन आमदार शिंदे गटात गेले. त्यांच्या विभागातील भाजप, राष्ट्रवादी, बहुजन आघाडी, पक्षातील पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटात साामील झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले धनुष्यबाण गोठवलं तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. धनुष्यबाण रामाचं होतं त्याने रावणाला मारण्यात आलं. मशालच्या अन्यायाला जाळणारी मशाल आहे आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आहे ती पुढे घेऊन जात काम करूयात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि उमेदवारीच्या रिंगणातून पळ काढला. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा त्रास द्यायचा आणि आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं. मी बुलढण्यात येणार आणि सभा घेणार, असं आश्वासही उद्धव ठाकरेंनी दिलं.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….